अॅड. विवेक गजशिव यांना नाशिक येथे सिने अभिनेत्री प्राजक्ता माळीच्या हस्ते ‘विझिनरी बिझनेस लिडर ऑफ द इअर’ या महाराष्ट्र बिझनेस अवार्डने सन्मानित
B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : बार्शीचे अॅड. विवेक गजशिव यांना महाराष्ट्राची प्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता माळी यांच्या हस्ते नाशिक येथील रॅडिसन ब्लू येथील हॉटेलमध्ये रिसिल डॉट इन या संथेकडून विझिनरी बिझनेस लिडर ऑफ द इअर’ या महाराष्ट्र अवार्डने सन्मानित करण्यात आले. यावेळी अॅड. विवेक गजशिव यांनी अत्यंत गरीब परिस्थितून केलेला प्रवास आणि त्यांनी विविध व्यवसायातून केलेली स्वतःची प्रगती यामुळे त्यांना रिसिल डॉट इन संस्थेकडून हा महाराष्ट्र लेवलचा पुरस्कार देण्यात आला. अॅड. गजशिव यांनी प्रिन्स क्रिएटिव बिझनेस ग्रुपच्या माध्यमातून सेक्युरिटी एजन्सी, टूर्स एंड ट्रॅव्हल्स,जीपी कंस्ट्रक्शन आणि किराणा एंड जनरल स्टोअर्सच्या माध्यमातून उद्योग व्यवसाय उभा करीत भरारी घेतली. उद्योग व्यवसायात प्रिन्स क्रिएटिव बिझनेस ग्रुपला हा मिळालेला पहिलाच पुरस्कार असल्याचे गजशिव यांनी यावेळी सांगितले.
यापूर्वी सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल अॅड. गजशिव यांना कोलंबो विद्यापीठाकडून डॉक्टरेट पदवी बहाल करण्यात आली होती. शिवाय राज्यस्तरीय डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार, मानवतावादी बहुउद्देशीय मंडळ संचलित राज्यस्तरीय राजमाता जिजाऊ – क्रांती ज्योती समाजभूषण पुरस्कार, राज्यस्तरीय वीर शिवछत्रपती महाराष्ट्ररत्न पुरस्कार, राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार, आंबेडकरी योद्धा पुरस्कार,राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार, भिमयोद्धा पुरस्कार,बार्शी युथ आयकॉन पुरस्कार अशा विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. यावेळी गजशिव यांचे सामाजिक, राजकीय सर्वच क्षेत्रातून शुभेच्छा देऊन अभिनंदन करण्यात आले.




