बार्शीसामाजिक

बागवान सोशल फाउंडेशनने केले विद्यार्थ्यांना शालेय साहित्य मोफत वाटप

मोहम्मद पैगंबर जयंती निमित्ताने राबवला आदर्श उपक्रम

B1न्यूज मराठी नेटवर्क

बार्शी : मोहम्मद पैगंबर जयंती निमित्ताने बार्शी बागवान सोशल फाउंडेशन यांचे वतीने छत्रपती क्रीडा शिक्षण व समाजसेवी संस्था संचालित दत्त प्राथमिक विद्या मंदिर व एडवोकेट दिलीपराव सोपल प्रशाला बार्शी येथील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य मोफत वाटप करण्यात आले. उद्या दिनांक 19 सप्टेंबर रोजी मोहम्मद पैगंबर यांची जयंती असल्याने आज बार्शी च्या शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य मोफत वाटप करून बार्शीतील बागवान फाऊंडेशन या संस्थेने आदर्श असा उपक्रम राबवला आहे या अगोदर त्यांनी कोरोणा काळात व इतर संकट वेळी सुद्धा खूप चांगले कार्य केले आहे.या बागवान सोशल फाउंडेशन च्या माध्यमातून आज पर्यंत कोरोणाच्या काळात गोरगरिबांना भाजी धान्य फळे वाटपाचा कार्यक्रम तसेच गराजुवंताना वेळोवेळी मदत करणे अनेक निराधार लोकांना व गरजू लोकांना कपडे ब्लॅंकेट वाटपाचा कार्यक्रम सुद्धा राबविण्यात आला आहे. व त्याचबरोबर जास्तीत जास्त गरजू शाळांना शालेय साहित्य वाटप करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. याची सुरुवात आज म्हणजे महंमद पैगंबर जयंतीनिमित्त शालेय साहित्य वाटप करून सुरूवात केली आहे यावेळी उपस्थित पाहुण्यांनी मध्ये बागवान सोशल फाऊंडेशनचे अध्यक्ष जुबेर भाई बागवान, शोएब भाई सय्यद उपाध्यक्ष बागवान सोशल फाउंडेशन, बादशहा बागवान , साहिल बागवान, आनंत दादा काशीद, धनंजय जगदाळे, एडवोकेट शेखर गुंड पाटील , रावसाहेब उर्फ बोला भाऊ अडसूळ भटक्या विमुक्त संघटना बार्शी शहर अध्यक्ष आसिफ भाई शेख, पत्रकार तानाजी घोडके, तसेच शाळेतील संस्थापक अध्यक्ष श्री मोहन अण्णा ठोंगे, मुख्याध्यापक दत्त प्राथमिक विद्यामंदिर बार्शी, मुख्याध्यापक सादिक बागवान, एडवोकेट दिलीपराव सोपल मुख्याध्यापक चंद्रकांत लोखंडे, श्रीमती काळे मॅडम, कुंभार सर, श्रीमती मठपती मॅडम,लंगोटे सर, जगताप , मोरे , काळे , ठोंगे , ठोंबरे , श्रीमती पाटील मॅडम, संदीप मोरे,
व सर्व विद्यार्थ उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button