निवडपुणेबार्शीमहाराष्ट्र

गुळपोळीचे सुपुत्र समाधान हनुमंत मचाले PSI यांची API पदी पदोन्नती

समाधान हनुमंत मचाले पोलीस उपनिरीक्षक (PSI) यांची सहायक निरीक्षकपदी पदोन्नती

B1न्यूज मराठी नेटवर्क

बार्शी : तालुक्यातील गुळपोळी गावचे सुपुत्र समाधान हनुमंत मचाले पोलीस उपनिरीक्षक (PSI) यांची सहायक निरीक्षकपदी पदोन्नती करण्यात आली आहे. समाधान मचाले हे पोलीस उपनिरीक्षक (PSI),पिंपरी चिंचवड आयुक्तालय निगडी पोलीस स्टेशन पुणे येथे कार्यरत होते. त्यांच्या पदोन्नती सोबतच बदलीही करण्यात आली असून त्यांना आता पुण्यातील एका अत्यंत जबाबदारीच्या विभागात नवी जबाबदारी दिली गेली आहे. अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स, पुणे ( Anti – Narcotics Task Force HP Police) येथे पदोन्नती झाली आहे.5000पोलीस उपनिरीक्षकांना (unarmed police sub-inspectors) सहायक निरीक्षकपदी (assistant police inspector) पदोन्नती मिळाली आहे. 341 पोलिसांना पदोन्नती मिळाली आहे. यासोबतच त्यांच्या बदल्याही करण्यात आल्या आहेत. पोलीस महासंचालकांनी याबाबत आदेश जारी केले आहेत. समाधान मचाले हे पुणे शहर 7 वर्ष तर पिंपरी चिंचवड 1 वर्ष सेवा केली आहे. त्यांचा प्रामाणिक, कर्तव्यनिष्ठ सेवाभाव आजच्या तरुण पिढीसाठी नक्कीच प्रेरणादायी आहे. पदोन्नती झाल्याबद्दल सर्वत्र स्तरावरून शुभेच्छाचा वर्षाव होत आहे.50000त्यांच्या सेवेतील प्रामाणिकपणा, वेळेवरची कार्यवाही, गुन्हे तपासातील कुशलता आणि जनतेशी सुसंवाद ठेवण्याची शैली यामुळे ते सर्वांच्या विश्‍वासास पात्र ठरले आहेत. गावकऱ्यांसह पोलिस दलातील सहकारी, मित्रमंडळी, आणि स्थानिक नागरीकांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांच्या या यशामुळे गुळपोळी गावाच्या नावलौकिकात भर पडली असून, ही बातमी गावकऱ्यांसाठीही अभिमानास्पद आहे.

समाधान मचाले यांना B1न्यूज मराठी परिवारातर्फे मनःपूर्वक शुभेच्छा आणि पुढील वाटचालीसाठी यशाच्या शुभेच्छा!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button