धाराशिवमहाराष्ट्र

‘विक्रमापेक्षा मोठा विक्रम झाडे जगविण्याचा करूया’ – पालकमंत्री प्रताप सरनाईक

‘हरित धाराशिव २.०’ची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद

B1न्यूज मराठी नेटवर्क500

धाराशिव : ‘हरित धाराशिव अभियान २.०’च्या माध्यमातून १२ तासांत १० लाखांहून अधिक वृक्षारोपण करून धाराशिवने गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नवा विक्रम नोंदविला आहे.मात्र,हा विक्रम केवळ आकड्यांपुरता मर्यादित न राहता लावलेली प्रत्येक रोपे जगविण्याची जबाबदारीही तितकीच महत्त्वाची आहे.‘आपण विक्रम तर केलाच; पण त्यापेक्षा मोठा विक्रम ही झाडे जगविण्याचा करूया,’ असे आवाहन पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी केले.

धाराशिवजवळील शिंगोली येथे वन विभागाच्या जागेसह जिल्ह्यातील आठ ठिकाणी १४ ऑगस्ट रोजी ‘हरित धाराशिव २.०’अंतर्गत १० लाख ९ हजार वृक्षांची लागवड करण्यात आली.या विक्रमाची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली.यानिमित्त शिंगोली येथील वन विभागाच्या परिसरात आज आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून पालकमंत्री सरनाईक बोलत होते.जिल्हा परिषद अध्यक्षा अर्चना पाटील, खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर,जिल्हा परिषद उपाध्यक्षा उषा गायकवाड,विशेष अतिथी सिनेअभिनेते तथा देवराईचे अध्यक्ष सयाजी शिंदे, जिल्हाधिकारी कीर्तिकिरण पुजार, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियंवदा म्हाडदळकर, पोलिस अधीक्षक रितू खोखर, लेखक व साहित्यिक अरविंद जगताप आणि शिंगोलीच्या सरपंच योगिता शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.500‘एक पेड माँ के नाम’ या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदेशातून प्रेरणा घेत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘हरित महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र’ या संकल्पनेला बळ देत धाराशिव जिल्ह्याने पर्यावरण संवर्धनाची लोकचळवळ उभी केली आहे.हरित धाराशिव अभियान १.०’अंतर्गत १९ जुलै २०२५ रोजी एकाच दिवशी १७ लाख १ हजार ८१५ वृक्षांचे रोपण करून जागतिक विक्रमाची नोंद करण्यात आली.या अभियानातील ८६.९७ टक्के रोपे जिवंत राहिली, ही धाराशिवकरांच्या सामूहिक प्रयत्नांची खरी पावती असल्याचे पालकमंत्री सरनाईक यांनी सांगितले.

‘हरित धाराशिव अभियान २.०’अंतर्गत १२ तासांत १० लाख ११ हजार स्थानिक प्रजातींच्या रोपांची लागवड करून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डची नोंद करण्यात आली.जिल्ह्यातील आठ ठिकाणी ८३.२६ एकर क्षेत्रावर मियावाकी पद्धतीने घनवन विकसित केले जात आहे.प्रत्येक रोपाला स्वतंत्र QR कोड देऊन त्याची डिजिटल नोंद करण्यात आली आहे.तसेच छायाचित्रण, व्हिडिओ रेकॉर्डिंग,ड्रोन शूटिंग आणि हस्तलिखित लॉगबुकच्या माध्यमातून लागवडीची अचूक नोंद ठेवण्यात आली.500

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button