महाराष्ट्रसोलापूर

शिवराज्याभिषेक दिनानिमित्त सोलापुरात छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन

B1न्यूज मराठी नेटवर्क50000

सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराज उद्यान रंगभवन, सोलापूर येथे जिल्हा परिषद सोलापूर यांच्या वतीने शिवराज्याभिषेक दिन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी छत्रपती शिवाजी महाराज स्मारकास पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.

यावेळी बोलताना शिवराज्याभिषेक दिनाचे ऐतिहासिक महत्त्व अधोरेखित करण्यात आले. ६ जून १६७४ रोजी रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक होऊन हिंदवी स्वराज्याची अधिकृत स्थापना झाली. परकीय सत्तेखालील जनतेला स्वाभिमान, न्याय व लोककल्याणकारी राज्यव्यवस्थेची दिशा देणारा हा ऐतिहासिक क्षण असल्याचे सांगण्यात आले.50000छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेच्या हिताला केंद्रस्थानी ठेवून उभे केलेले स्वराज्य आजही सुशासन, धैर्य आणि राष्ट्रनिष्ठेची प्रेरणा देत असल्याचे मान्यवरांनी नमूद केले. तसेच जनतेच्या सेवेसाठी व विकासासाठी कटिबद्ध राहण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.

या कार्यक्रमास जिल्हा परिषद अध्यक्ष दिपक वैद्य, उपाध्यक्ष इंद्रजित पवार, शिक्षण व आरोग्य सभापती चेतनसिंह केदार-सावंत, महापौर विनायक कोंडयाल, सभापती रामप्पा चिवडशेट्टी, सभापती अमृता वाघे, शहर जिल्हाध्यक्षा रोहिणी तडवळकर, गटनेते नरेंद्र काळे, मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांच्यासह जिल्हा परिषद अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.500

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button