आंदोलनबार्शीमहाराष्ट्र

मधुबन ट्रॅक्टर्स येथे जॉन डियर TREM-IV टेक्नॉलॉजी च्या 5405 ट्रॅक्टरचे अनावरण

B1न्यूज मराठी नेटवर्क

बार्शी : जॉन डियर कंपनीच्या भारतातील रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त मधुबन ट्रॅक्टर्स येथे जॉन डियर TREM-IV टेक्नॉलॉजीच्या 5405 या 63 एचपी ट्रॅक्टरचे अनावरण जॉन डीअर चे सर्वात जुने ग्राहक तानाजी विधाते यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जॉन डीअर कंपनीच्या पावर अँड टेक्नॉलॉजी 4.0 चे डिजिटल प्रक्षेपण करण्यात आले. या कार्यक्रमाला जॉन डीअर कंपनीचे असिस्टंट एरिया मॅनेजर श्री कैलास तासकर, मधुबन ट्रॅक्टर्स चे चेअरमन प्रवीण कसपटे, प्रमुख व्यवस्थापक माणिक हजारे तसेच उस्मानाबाद जिल्हा व बार्शी तालुक्यातील शेतकरी व ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते.कैलास तासकर यांनी सर्व ग्राहकांना जॉन डीअर च्या पॉवर अँड टेक्नॉलॉजी 4.0 ची विस्तारपूर्वक माहिती दिली. प्रवीण कसपटे यांनी जॉन डियर कंपनीच्या 25 वर्षाच्या प्रवासामध्ये मधुबन ट्रॅक्टरचे देखील पंधरा वर्षे यशस्वीरित्या पूर्ण झाल्याचे सांगितले तसेच याचे संपूर्ण श्रेय आपले ग्राहक व सर्व टीम यांना दिले. जॉन डीअर च्या TREM-IV 5405 या 63 एचपी फोर व्हील ड्राईव्ह ट्रॅक्टर चे सर्वप्रथम बुकिंग तुषार बाबुराव साळुंखे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मधुबन ट्रॅक्टर्स संपूर्ण टीमने परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button