पुरस्कारमहाराष्ट्रसोलापूर

उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय व ग्रंथमित्र पुरस्कारासाठी 25 सप्टेंबरपर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

B1न्यूज मराठी नेटवर्क500

सोलापूर : महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत ग्रंथालय संचालनालयामार्फत राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांचा गुणात्मक विकास व्हावा, नागरिकांना दर्जेदार ग्रंथालयीन सेवा उपलब्ध व्हाव्यात आणि वाचन संस्कृतीला प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने “डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय पुरस्कार” तसेच “डॉ. एस. आर. रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता व सेवक – ग्रंथमित्र पुरस्कार” देण्यात येतात.

राज्यातील शहरी व ग्रामीण भागातील ‘अ’, ‘ब’, ‘क’ आणि ‘ड’ वर्गातील उत्कृष्ट शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांना अनुक्रमे रु. 1 लाख, रु. 75 हजार, रु. 50 हजार आणि रु. 25 हजार अशी रोख रक्कम, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व ग्रंथभेट देऊन गौरविण्यात येणार आहे.500तसेच राज्यस्तरावर एक उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता आणि एक उत्कृष्ट ग्रंथालय सेवक यांना प्रत्येकी रु. 50 हजार रोख रक्कम, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व ग्रंथभेट दिली जाणार आहे. याशिवाय प्रत्येक महसुली विभागातील एका उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्त्यास व एका उत्कृष्ट ग्रंथालय सेवकास प्रत्येकी रु. 25 हजार रोख रक्कम, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व ग्रंथभेट देऊन सन्मानित करण्यात येईल.

सन 2025-26 या वर्षासाठी पुरस्कारासाठी इच्छुक असलेल्या ग्रंथालयांनी तसेच ग्रंथालय कार्यकर्ते व सेवक – ग्रंथमित्र यांनी विहित नमुन्यातील प्रस्ताव आवश्यक कागदपत्रांसह तीन प्रतींमध्ये 25 सप्टेंबर 2026 पर्यंत आपल्या जिल्ह्यातील /जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाकडे सादर करावेत.

पुरस्कारासाठी पात्र असलेल्या ग्रंथालये, कार्यकर्ते व सेवकांनी विहित मुदतीत प्रस्ताव सादर करून या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्र. ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.500

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button