निवडबार्शीमहाराष्ट्र

सेवानिवृत्त एसटी चालकाची कन्या स्पर्धा परीक्षेत चमकली – कोणताही क्लास न लावता महसूल सहायक पद मिळवले

B1न्यूज मराठी नेटवर्क

बार्शी : जिद्द, चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर यश मिळवता येते, हे सौंदरे (ता. बार्शी) येथील भारती दत्तात्रय नाडे यांनी सिद्ध करून दाखवले आहे. कोणताही खासगी क्लास न लावता केवळ सेल्फ स्टडीच्या जोरावर त्यांनी महसूल सहायक पदाची स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण केली. त्यांच्या या संघर्षमय यशाची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे.

भारती नाडे या सेवानिवृत्त एसटी चालकाच्या कन्या असून त्यांचे संपूर्ण शिक्षण ग्रामीण भागात झाले आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी त्यांनी पुणे गाठले, मात्र यादरम्यान कोरोनाचा प्रादुर्भाव आणि त्यानंतरच्या आरक्षण घडामोडींमुळे परीक्षा वारंवार लांबणीवर पडत होत्या. त्यामुळे आर्थिक आणि मानसिक तणाव वाढला होता.

कुटुंबाच्या परिस्थितीची जाणीव ठेवत भारती यांनी कोणत्याही खासगी क्लासशिवाय स्वबळावर अभ्यास सुरू ठेवला. सातत्यपूर्ण प्रयत्न आणि आत्मविश्वासाच्या बळावर अखेर महसूल सहाय्यक पद मिळवण्यात त्या यशस्वी झाल्या.

“हे यश हा केवळ पहिला टप्पा आहे. मोठ्या पदांसाठी मी पुढेही अभ्यास सुरू ठेवणार आहे,” अशी प्रतिक्रिया भारती नाडे यांनी दिली. त्यांच्या या जिद्दीला आणि मेहनतीला गावकऱ्यांसह परीवार आणि मित्रमंडळींच्या शुभेच्छा लाभत आहेत.

भारती यांच्या यशामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मोठी प्रेरणा मिळाली आहे. कोणताही क्लास न लावता फक्त मेहनतीच्या जोरावर यश मिळवता येते, हे त्यांनी दाखवून दिले आहे. त्यांच्या या संघर्षमय यशाची सर्वत्र प्रशंसा होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button