कोल्हापूरमहाराष्ट्रसत्कार

जागतिक कुस्ती स्पर्धेत कोल्हापूरच्या अमृताची रौप्यभरारी!

U-23 जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत अमृता पुजारीची ऐतिहासिक कामगिरी; जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांच्या हस्ते अमृता व प्रशिक्षक दादासो लवटे यांचा सत्कार

B1न्यूज मराठी नेटवर्क500

कोल्हापूर : अमेरिकेतील लास वेगास येथे झालेल्या U-23 जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत महिलांच्या ७२ किलो वजनी गटात रौप्यपदक पटकावून कोल्हापूरच्या कु. अमृता पुजारी हिने आंतरराष्ट्रीय कुस्ती क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविला आहे. तिच्या या दैदीप्यमान कामगिरीनंतर आज कोल्हापुरात आगमन झाल्यावर जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांच्या हस्ते तिचा तसेच तिचे आंतरराष्ट्रीय कुस्ती प्रशिक्षक दादासो लवटे यांचा सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला.

यावेळी उपजिल्हाधिकारी श्रीमती मोहिनी चव्हाण, विभागीय उपसंचालक, क्रीडा व युवक सेवा, कोल्हापूर विभाग, सुहास पाटील, NIS कुस्ती प्रशिक्षक चंद्रकांत चव्हाण आणि वसंत पाटील उपस्थित होते.500जिद्द, सातत्यपूर्ण सराव आणि कठोर परिश्रम यांच्या बळावर जागतिक स्तरावर यश मिळविता येते, याचे अमृता पुजारी हे प्रेरणादायी उदाहरण आहे. मुरगूड येथील लोकनेते सदाशिवराव मंडलिक राष्ट्रीय (SAI) कुस्ती संकुलात सराव करणाऱ्या अमृताने आपल्या मेहनतीच्या जोरावर जागतिक स्पर्धेत रौप्यपदकाची कमाई केली. तिच्या या यशामुळे कोल्हापूरच्या कुस्ती परंपरेला आंतरराष्ट्रीय स्तरावर आणखी एक मानाचा तुरा लाभला आहे.

कोल्हापूर जिल्ह्याला कुस्तीची समृद्ध परंपरा लाभली असून, अमृता पुजारी हिने जागतिक स्तरावर मिळविलेल्या यशामुळे या परंपरेचा गौरव वाढला आहे. तिच्या पुढील क्रीडा कारकिर्दीसाठी सर्व उपस्थितांनी शुभेच्छा दिल्या.500

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button