आरोग्यबार्शीमहाराष्ट्रशिबीर

चैतन्य क्लिनिकच्या द्वितीय वर्धापन दिनानिमित्त २० ऑक्टोबरला ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत फिजिओथेरपी शिबिर

गुडघेदुखी, पाठदुखी, कंबरदुखी व खांदेदुखीवर मोफत तपासणी आणि उपचार; चैतन्य क्लिनिक, गुळपोळी येथे आयोजन

B1न्यूज मराठी नेटवर्क500

बार्शी , गुळपोळी : चैतन्य क्लिनिक, गुळपोळी यांच्या द्वितीय वर्धापन दिनानिमित्त ज्येष्ठ नागरिकांसाठी सोमवार, दि. २० ऑक्टोबर २०२६ रोजी मोफत फिजिओथेरपी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांना आरोग्य तपासणी, फिजिओथेरपी उपचार आणि व्यायामाबाबत मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

या शिबिरात गुडघेदुखी, पाठदुखी, कंबरदुखी आणि खांदेदुखी यांसारख्या समस्यांवर तपासणी व उपचार केले जाणार आहेत. तसेच वेदना व्यवस्थापन, थेरपी, संतुलन व चालण्यामध्ये सुधारणा आणि दैनंदिन जीवन अधिक सुलभ करण्यासाठी आवश्यक प्रशिक्षण दिले जाणार आहे.

वाढत्या वयात उद्भवणाऱ्या शारीरिक समस्यांवर योग्य उपचार व नियमित व्यायामाचे महत्त्व लक्षात घेऊन या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. ज्येष्ठ नागरिकांना वेदनामुक्त जीवन जगण्यासाठी मार्गदर्शन करणे, सुरक्षित फिजिओथेरपी उपचार उपलब्ध करून देणे आणि स्वावलंबी जीवनासाठी आवश्यक आधार देणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.500

शिबिराचा तपशील :

  • दिनांक : २० ऑक्टोबर २०२६
  • वेळ : सकाळी ९ ते दुपारी १.३० वाजेपर्यंत
  • स्थळ : चैतन्य क्लिनिक, गुळपोळी
  • प्रवेश : मोफत; नोंदणी अनिवार्य

शिबिरामध्ये डॉ. शरद चिकणे, डॉ. तनुजा चिकणे, डॉ. चैतन्य देशपांडे आणि समाधान गोरे यांच्या माध्यमातून उपचार व मार्गदर्शन करण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी डॉ. तनुजा चिकणे यांच्याशी ७०२०२२१०२२ किंवा समाधान गोरे यांच्याशी ८५५२८४५४५० या क्रमांकांवर संपर्क साधावा.

ज्येष्ठ नागरिकांनी या मोफत आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन चैतन्य क्लिनिकच्या वतीने करण्यात आले आहे.500

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button