बार्शीमहाराष्ट्रशैक्षणिक

अवघ्या २२ व्या वर्षी पियुष जाधव बनले सनदी लेखापाल; बार्शीच्या शिरपेचात मानाचा तुरा

सनदी लेखापाल (C.A.) परीक्षेत पियुष जाधव यांचे घवघवीत यश

B1न्यूज मराठी नेटवर्क50000

बार्शी : वाणिज्य शाखेतील अत्यंत कठीण व प्रतिष्ठेची मानली जाणारी सनदी लेखापाल (चार्टर्ड अकाउंटंट – C.A.) परीक्षेत बार्शीतील पियुष संतोष जाधव यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. त्यांच्या या यशामुळे बार्शी शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.500पियुष यांचे माध्यमिक शिक्षण यशोधरा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित सोजर कॅम्पबेल इंग्लिश मीडियम स्कूल, बार्शी येथे झाले. त्यानंतर त्यांनी पुण्यातील सिंबायोसिस ज्युनिअर कॉलेज येथे उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. अवघ्या २२ व्या वर्षी त्यांनी सी.ए. परीक्षेत यश मिळवून आपल्या जिद्दी, चिकाटी आणि मेहनतीची प्रचिती दिली आहे.50000वाणिज्य व व्यवसाय क्षेत्राची कोणतीही कौटुंबिक पार्श्वभूमी नसतानाही पियुष यांनी वेळेचे योग्य नियोजन, अथक परिश्रम आणि सातत्यपूर्ण अभ्यासाच्या जोरावर हे यश मिळवले. त्यांच्या या यशामागे कुटुंबीयांचे आणि मार्गदर्शकांचे मोठे योगदान असल्याचे सांगितले जात आहे. पियुष सोनवणे यांच्या या यशाबद्दल बार्शी शहरातील शैक्षणिक, सामाजिक व विविध क्षेत्रांतील मान्यवरांकडून त्यांचे अभिनंदन होत असून, तरुण विद्यार्थ्यांसाठी ते प्रेरणादायी ठरले आहेत.5000

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button