बसस्थानकात ‘जीवनरक्षक’ प्रशिक्षण; बार्शी आगारातील ५०० कर्मचाऱ्यांना प्रतिसाद फाउंडेशनच्या वतीने CPR चे धडे

0

B1न्यूज मराठी नेटवर्क500

बार्शी : वाढत्या धकाधकीच्या जीवनशैलीमुळे हृदयविकाराच्या घटनांमध्ये वाढ होत असताना, आपत्कालीन परिस्थितीत एखाद्याचे प्राण वाचविण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणारे CPR (कार्डिओपल्मोनरी रिससिटेशन) प्रशिक्षण बार्शी बसस्थानक येथे घेण्यात आले. २० ऑगस्ट २०२६ रोजी बार्शी आगारातील कर्मचाऱ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या या कार्यशाळेत सुमारे ५०० कर्मचाऱ्यांना CPRचे शास्त्रीय पद्धतीने प्रशिक्षण देण्यात आले.

सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा मोठ्या प्रमाणावर वापर होत असून, बसस्थानकावर एकाच वेळी मोठ्या संख्येने प्रवासी उपस्थित असतात. त्यात ज्येष्ठ नागरिकांची संख्याही लक्षणीय असते. त्यामुळे प्रवासादरम्यान किंवा गर्दीच्या ठिकाणी एखाद्या व्यक्तीला अचानक वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तातडीने मदत मिळणे महत्त्वाचे ठरते.500या कार्यशाळेत डॉ. धीरज जाधव (MD, इमर्जन्सी मेडिसिन) यांनी कर्मचाऱ्यांना CPR कधी आणि कसा द्यावा, याचे मार्गदर्शन प्रत्यक्ष प्रात्यक्षिकासह करून दाखवले. कर्मचाऱ्यांनीही अत्यंत काळजीपूर्वक प्रात्यक्षिक पाहून CPRची पद्धत आत्मसात केली तसेच स्वतः प्रात्यक्षिक करून दाखवले.

या उपक्रमामुळे बार्शी आगारातील कर्मचाऱ्यांमध्ये आपत्कालीन परिस्थिती हाताळण्याबाबत जनजागृती व आत्मविश्वास निर्माण झाला आहे. प्रवासादरम्यान किंवा गर्दीच्या ठिकाणी एखाद्या व्यक्तीला गरज भासल्यास प्रशिक्षित कर्मचारी तातडीने प्राथमिक जीवनरक्षक मदत करू शकतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

“या प्रशिक्षणाचा फायदा प्रवाशांसह समाजातील सर्वच घटकांना होईल,” अशी अपेक्षा प्रतिसाद फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. देविदास इंगळे यांनी व्यक्त केली. यावेळी डॉ. पवन कोळी, डॉ. विनायक हगरे, डॉ. प्रीतम इंगळे, आगर प्रमुख हांडे,बार्शी आगारातील कर्मचारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.5000

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या