श्री शिवाजी महाविद्यालयात सायबर सुरक्षा व महिला सुरक्षेवर मार्गदर्शन कार्यक्रम उत्साहात संपन्न

0

B1न्यूज मराठी नेटवर्क500

बार्शी : श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री शिवाजी महाविद्यालय, बार्शी येथे निर्भया पथक (बार्शी उपविभाग) आणि बार्शी शहर पोलीस ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने ११ ऑगस्ट २०२६ रोजी सायबर सुरक्षा जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. बी. शेख यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास सुमारे ७०० ते ८०० विद्यार्थी व प्राध्यापकांनी उत्स्फूर्त उपस्थिती दर्शवली.

बार्शी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गणेश कुंभार हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्यासोबत सहायक पोलीस निरीक्षक नेताजी गंधारे, उपप्राचार्य रविंद्र वायकर, सायबर पोलीस ठाण्याचे जुबेर तांबोळी, महिला पोलीस कॉन्स्टेबल अश्विनी गोटे, तसेच निर्भया पथकाचे बाबासाहेब घाडगे, उज्ज्वल नाईक निंबाळकर व नम्रता गटकूळ उपस्थित होते.

महत्त्वाचे मार्गदर्शन: उपस्थितांना सायबर गुन्हे, ऑनलाइन आर्थिक फसवणूक, सोशल मीडियाचा सुरक्षित वापर, OTP व बँकिंग गोपनीयता, अनोळखी लिंक टाळणे आणि महिला व मुलींच्या सुरक्षेविषयी सविस्तर माहिती देण्यात आली.500पोलीस अधिकाऱ्यांचे आवाहन: पोलीस निरीक्षक गणेश कुंभार, सपोनि नेताजी गंधारे व अन्य मान्यवरांनी विद्यार्थ्यांनी मोबाईल व इंटरनेटचा वापर जबाबदारीने करावा, तसेच कोणतीही अनुचित घटना घडल्यास तात्काळ सायबर पोलीस किंवा निर्भया पथकाशी संपर्क साधावा, असे आवाहन केले. अध्यक्षीय मनोगत: डॉ. ए. बी. शेख यांनी डिजिटल युगात अशा जनजागृतीपर उपक्रमांचे महत्त्व सांगत अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले.

सदर कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी निर्भया पथकाचे पोहेकॉ बाबासाहेब घाडगे व त्यांच्या सहकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन यादव एम. आर. व पवार ए. ए. यांनी केले, तर अर्जुन सुतार यांनी उपस्थितांचे आभार मानले.500

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या