राज्यातील विमा कंपन्यांच्या नावाने शेतकऱ्यांचा शिमगा! तर पिक विमा बंद करून डायरेक्ट शेतकऱ्याचे नावे पैसे जमा करा ..शंकर गायकवाड

पिकवीमा कंपन्यांच्या नावाने शिमगा आंदोलन करताना शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष शंकर गायकवाड व शेतकरी
B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी , दि.12 ऑगस्ट, : बार्शी तालुक्यातील वानेवाडी येथील मुख्य चौकामध्ये शेतकऱ्यांनी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष शंकर गायकवाड यांचे नेतृत्वाखाली राज्यातील शेतकऱ्यांच्या थकीत पिक विम्यासाठी शेतकऱ्यांना लुटणाऱ्या सर्व विमा कंपन्यांच्या नावाने बोंबाबोंब करून शिमगा आंदोलन केले. त्यावेळी बोलताना गायकवाड म्हणाले की, जर विमा कंपन्यां व सरकारला शेतकऱ्यांचा पूर्ण विमा परतावा देणं होत नसेल तर सरकारने प्रधानमंत्री पिक विमा योजना बंद करून, आजपर्यंत प्रतिहेक्टरी केलेल्या खर्चा प्रमाणे डायरेक्ट शेतकऱ्यांच्या नावे दरवर्षी खरीप आणि रब्बी हंगामाला मदत म्हणून प्रति हेक्टरी 18 हजार रुपये जमा करावेत, किंवा खरीप 2025 मधे राज्यातील वगळलेली सर्व मंडळे घेऊन आजपर्यंतचा सर्व थकीत व लुटलेला पीकविमा तत्काळ जमा करावा अन्यथा लवकरच विमा कंपन्या व संबंधित शासकीय राज्यस्तरीय कार्यालयावरती तीव्र स्वरूपाची आंदोलने करण्यात येतील असाही इशारा यावेळी शंकर गायकवाड यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिला.
त्यावेळी सरपंच बापूराव गरदडे, महादेव यादव, बिभीषण जोडवे, संदीप सुर्वे, पिनू सुर्वे, विठ्ठल गरदडे, रामराव शिंदे, पांडुरंग यादव, दगडू यादव, अमोल सुर्वे, गंगाधर सुर्वे, नाना क्षीरसागर, दिलीप सुर्वे, चंद्रकांत यादव, लक्ष्मण गरदडे, संजय सुर्वे, बाळू सुर्वे, सुभाष शिंदे, प्रमोद सुर्वे, लक्ष्मण काटे, श्रीहरी यादव, मारुती गरदडे, पोपट यादव, शामराव लोखंडे, योगेश यादव, समाधान यादव, बाबासाहेब सुर्वे, शंकर यादव, पांडुरंग शिंदे, आकाश गायकवाड, आबासाहेब लोखंडे, किशोर लावंड, दादा गरदडे, नरसोबा खुरंगळे, आप्पा गायकवाड, गणेश सुर्वे आदींसह बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते.




