हर घर तिरंगा २०२६ अभियानांतर्गत बार्शीत भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन

0

B1न्यूज मराठी नेटवर्क500

बार्शी, दि. ११ : स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या “हर घर तिरंगा २०२६” अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद देण्यासाठी बार्शी शहरात भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. ही रॅली गुरुवार, दि. १३ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ९.०० वाजता निघणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.

रॅलीची सुरुवात कृषी उत्पन्न बाजार समिती, तुळजापूर रोड, बार्शी येथून होणार असून ती शहरातील प्रमुख मार्गांवरून मार्गक्रमण करणार आहे. रॅलीचा मार्ग पुढीलप्रमाणे निश्चित करण्यात आला आहे.

बाजार समिती – पोस्ट चौक – जुने पोलीस स्टेशन – पांडे चौक – शिवसृष्टी – तानाजी चौक – बेदराई चौक – हांडे गल्ली – पंचायत समिती – शहीद स्मारक.500या तिरंगा रॅलीत मोठ्या संख्येने युवक, नागरिक, व्यापारी, सामाजिक कार्यकर्ते तसेच भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी सहभागी होणार आहेत. रॅलीदरम्यान देशभक्तिपर घोषणांनी आणि हातात तिरंगा घेऊन नागरिक देशप्रेमाची भावना व्यक्त करणार आहेत.

या कार्यक्रमाचे आयोजन भारतीय जनता पार्टी व भारतीय जनता युवा मोर्चा, बार्शी शहर व तालुका यांच्या वतीने करण्यात आले असून, नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन “हर घर तिरंगा” अभियान यशस्वी करावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. 500

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या