बार्शीमहाराष्ट्र

वैरागात पोलिसांतर्फे इफ्तार पार्टी

वैराग (ता. बार्शी) पोलिस ठाण्याच्या वतीने मुस्लिम बांधवांसाठी आयोजीत रोजा इफ्तार पार्टीमध्ये मुस्लिम बांधव ,शहरातील मान्यवर ,पोलिस कर्मचारी आदी

B1न्यूज मराठी नेटवर्क

वैराग : पवित्र महिना रमजान निमित्ताने वैराग पोलिस ठाण्याच्या वतीने मुस्लिम बांधवांसाठी रोजा इफ्तार पार्टीचे बुधवारी सायंकाळी आयोजन करण्यात आले होते. सध्या मुस्लिम समाज बांधवांचा पवित्र रमजान महिना सुरू असून एकात्मता, भाईचारा या भूमिकेतून वैराग पोलिस ठाण्याच्या वतीने रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन केले होते. पोलिस निरीक्षक विनय बहिर यांच्या मार्गदर्शनाखाली मुस्लिम बांधवांसाठी पोलिस ठाण्याच्या आवारात हा कार्यक्रम आयोजित केला होता.


यावेळी अतिथी म्हणून मौलाना आशिफ पाशा सय्यद ,बशीर कुरेशी , मौलाना आझाद विचार मंचचे जिल्हाध्यक्ष इस्माईल पटेल , वैराग नगरपंचायत चे उपनगराध्यक्ष निरंजन भूमकर ,सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी सभापती मकरंद निंबाळकर , माजी ग्रामपंचायत सदस्य वैजिनाथ आदमाने , अरुण सावंत , वंचित बहुजन आघाडीचे समाधान भालशंकर ,दीपक लोंढे , दत्तात्रय क्षीरसागर , रौफ बागवान , मोहसीन शेख , अझर पठाण , असलम कुरेशी , बाबा शेख ,पोलिस कर्मचारी तसेच शहरातील मान्यवरांसह मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button