निवेदनबार्शीमहाराष्ट्र

राज्य तृतीयपंथी कल्याण मंडळ पुनर्गठीत करा राज्यातील तृतीयपंथी समुदायाची सामाजिक मंत्र्यांकडे मागणी…

प्रस्तावावर मंत्री मंडळात चर्चा राज्यमंत्री मिसाळ यांचे करण्याचे आश्वासन या प्रस्तावावर मंत्री मंडळात चर्चा करण्याचे आश्वासन राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी दिले. भविष्यात यासाठी योग्य पावले उचलली जातील. हे मंडळ स्थापन केल्याने समाजातील विविध घटकांचे कल्याण होईल आणि त्यांच्या जीवनमानात सुधारणा होईल, असेही मिसाळ म्हणाल्या…

B1न्यूज मराठी नेटवर्क

बार्शी : राज्यातील तृतीयपंथी समुदायाच्या उन्नतीसाठी स्थापन करण्यात आलेले राज्य तृतीयपंथी कल्याण मंडळ पुनर्गठीत करा, अशी मागणी राज्यातील सर्व तृतीयपंथी समुदाय यांच्यावतीने करण्यात आली. यासाठी पुण्यात केंद्रीय राज्य मंत्री मुरलीधर मोहोळ आणि राज्याच्या सामाजिक न्याय राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांची भेट घेऊन त्यांना तसे निवेदन देण्यात आले. तृतीयपंथी सामाजिक कार्यकर्ता डॉ. सान्वी जेठवानी ( अध्यक्ष, सप्तारंग सेवाभावी संस्था, नांदेड ), मयुरी आळवेकर ( अध्यक्ष, मैत्री फाउंडेशन, कोल्हापूर ) आणि बार्शीचे सामाजिक कार्यकर्ता सचिन वायकुळे उपस्थित होते.

तृतीयपंथी समुदायाच्या आर्थिक उन्नतीसाठी तसेच रोजगार उपलब्धता , समाजकल्याण आणि विविध सामाजिक सेवांमध्ये सुधारणा करण्याच्या दृष्टीने तृतीयपंथी कल्याण मंडळाची स्थापना करण्यात आली . मध्यंतरी काही कारणास्तव हे खंडित झाले. पुन्हा एकदा या मंडळाची पुनर्स्थापना करावी, या मागणीचे निवेदन दोन्ही मंत्र्यांना देण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button