महाराष्ट्रसोलापूर

युवकांनी नोकरी न लागल्यास निराश न होता स्वयंरोजगारावर भर द्यावा – युवा नेते प्रदिप चौगुले

B1न्यूज मराठी नेटवर्क5000

माढा : आज प्रत्येक क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर सुशिक्षित बेरोजगारांची संख्या वाढत आहे त्यामुळे अनेक तरुण नैराश्याच्या गर्तेत जातात.काही जण जगण्यासाठी शासकीय नोकरी नाही म्हणून टोकाची भूमिका घेतात तेंव्हा यावर उपाय म्हणून युवकांनी नोकरी न लागल्यास निराश न होता लहान-मोठ्या व्यवसायातून स्वयंरोजगार निर्मिती करावी असे आवाहन सरपंच प्रतिनिधी प्रदिप चौगुले यांनी केले आहे.

ते अंजनगाव खेलोबा ता.माढा येथे श्री जाधव परिवाराच्या मातोश्री डिजिटल सोल्यूशन्सच्या उद्घाटनाच्या वेळी बोलत होते.500

यावेळी सेवानिवृत्त कृषी विस्ताराधिकारी सज्जनराव जाधव यांनी सांगितले की, आजच्या स्पर्धेच्या युगात उच्च दर्जाच्या गुणवत्तेशिवाय शासकीय नोकरीची संधी मिळत नाही त्यामुळे युवकांनी निराश न होता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून कृषी व कृषीपूरक व्यवसाय व उद्योग उभारले पाहिजेत.नोकर होण्यापेक्षा मालक होणे अधिक चांगले आहे. कोणत्याही क्षेत्रात प्रामाणिकपणे काम केले की,अपेक्षित अर्थार्जन होऊन जीवन नक्कीच यशस्वी होते असे त्यांनी सांगितले.5000यावेळी हभप शिवाजी जाधव, सेवानिवृत्त बँक इन्स्पेक्टर व्यंकटराव पाटील, सेवानिवृत्त विस्तार अधिकारी सज्जनराव जाधव,अर्जून जाधव,समाधान इंगळे, विनायक चौगुले,किसन क्षीरसागर,आनंद पाटेकर, तात्या लटके,दिलीप चौगुले, गहिनीनाथ गडेकर,रोहित लटके,शुक्राचार्य लटके,महादेव गडेकर,अजिंक्य पाटील,सचिन चौगुले,मनोज चव्हाण,अतुल सुरवसे,दिगंबर जाधव,सिद्धेश्वर जाधव,रोहित इंगळे,अंगद लटके,दत्तोपंत लटके,दगडू इंगळे,संग्राम इंगळे,सुरेश जाधव,लखन डोके यांच्यासह ग्रामस्थ व युवक उपस्थित होते.5000

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button