जयंतीमहाराष्ट्ररायगड

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक समता सप्ताहाचे आयोजन 

B1न्यूज मराठी नेटवर्क

रायगड : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडील सर्व कल्याणकारी योजनांची माहिती सर्वसामान्य जनतेला व्हावी. तसेच जनतेत जनजागृती निर्माण व्हावी या हेतूने दि. 08 एप्रिल  ते 14 एप्रिल 2025 या कालावधीत “भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमांचा जास्तीत जास्त नागरीकांना लाभ घ्यावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त समाज कल्याण सुनिल जाधव यांनी केले आहे.

या कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील शाळा महाविद्यालये वसतिगृहात भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारावर वक्तृत्व स्पर्धा व निबंध स्पर्धेचे आयोजन, विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांचे प्रातिनिधीक स्वरुपात लाभार्थ्यांना लाभाचे वाटप, समतादूतामार्फत ग्रामीण व शहरी भागामध्ये पथनाटय व लघुनाटिकाव्दारे विविध योजनांचे प्रबोधन, मार्जिन मनी योजनेंतर्गत कार्यशाळेचे आयोजन, महात्मा फुले यांच्या सामाजिक कार्याविषयी व्याख्यान, संविधान जागर, महिला मेळाव्याचे आयोजन, जेष्ठ नागरीकासाठी जनजागृती शिबीर व मेळावा तसेच आरोग्य शिबीर, अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या वस्त्यामधून स्वच्छता अभियान, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमीत्त अभिवादन व इतर कार्यक्रम, कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभीमान मेळावा व जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीमार्फत ऑनलाईन व्हॅलिडीटी प्रमाणपत्राचे प्रदान इ. कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button