बार्शीमहाराष्ट्र

शेळके परिवाराने सामाजिक बांधिलकी जपत तृतीयपंथींना साडी वाटप करून पुण्यतिथी केली साजरी

B1न्यूज मराठी नेटवर्क

बार्शी : दि. २६ नोव्हेंबर, बार्शीतील तृतीयपंथी समाजाला साडी वाटप करून आगळ्या वेगळ्या पध्दतीने आईचे स्मरण करणारा उपक्रम येथील उद्योजक सामाजिक कार्यकर्ते सुरेश शेळके यांनी राबविला आहे. इतरांनाही प्रेरणा मिळावी या हेतूनेच हा उपक्रम राबविला आहे. सामाजापासून दूर असलेला वंचित घटक म्हणून तृतीयपंथींकडे पाहिले जात आहे. तृतीयपंथींयांसाठी उपक्रम घेत, त्यांना मदतीचा हात दिल्याशिवाय तसेच संवादी राहिल्याशिवाय त्यांच्यात परिवर्तनाचा विचार जागृत होणार नाही, हा विचार समोर ठेवत येथील सचिन वायकुळे यांनी वंचित मानल्या जाणाèया या तृतीयपंथी समुहासाठी काम सुरु केले. या कार्यासाठी अनेकस्तरातून सहकार्य मिळण्यास सुरुवात झाली. यातूनच बार्शीतील उद्योजक तथा सामाजिक कार्यकर्ते सुरेश शेळके यांनी स्व. नेत्रावती शेळके या आपल्या आईच्या पुण्यतिथीनिमित्त तृतीयपंथींना साडी वाटप करण्याचा उपक्रम घेतला.बार्शीच्या स्मार्ट अ‍ॅकॅडमी भाषण प्रशिक्षण केंद्रात हा उपक्रम घेण्यात आला.

बार्शीसह वैराग परिसरातील तृतीयपंथींना यावेळी राणी शेळके व पल्लवी शेळके यांच्या उपस्थिती साडीचे वाटप करण्यात आले. यापुढेही सासरे सुरेश शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली असे सामाजिक उपक्रम निश्चित घेऊ, असे पल्लवी शेळके यांनी यावेळी सांगितले. यावेळी लेखक सचिन वायकुळे यांनीही या उपक्रमाचा उद्देश सांगत तृतीयपंथीं समुहाला मार्गदर्शन केले. दरम्यान, सुरेश शेळके यांनीही आशा वंचित घटकांसाठी आपल्या संस्थेच्या माध्यमातून अनेक उपक्रम राज्यभरात घेतले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button