बार्शीमहाराष्ट्र

पाणीटंचाईच्या संकटात अमोल भैय्या डिसले यांचा पुढाकार; स्वखर्चातून मोफत पाणीपुरवठा उपक्रमास प्रारंभ!

B1न्यूज मराठी नेटवर्क5000

बार्शी : वाढत्या उन्हामुळे निर्माण झालेली पाणीटंचाईची गंभीर परिस्थिती आणि उपलब्ध टँकरांची अपुरी संख्या लक्षात घेता नागरिकांची गैरसोय होऊ नये या उद्देशाने सामाजिक बांधिलकी जपत अमोल भैय्या डिसले यांनी स्वखर्चातून मोफत पाणीपुरवठा उपक्रम सुरू केला आहे. राजाभाऊ राऊत आणि नानासाहेब राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमाचा शुभारंभ परिसरातील ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते नारळ फोडून करण्यात आला.

सध्या अनेक भागांमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवत असून नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत समाजाप्रती असलेली जबाबदारी लक्षात घेऊन अमोल भैय्या डिसले यांनी हा उपक्रम हाती घेतला असून नागरिकांकडून त्याचे स्वागत करण्यात येत आहे.5900या शुभारंभ कार्यक्रमास उपनगराध्यक्ष रोहित भैय्या पाटील, पाणीपुरवठा सभापती भैय्या बरंगुळे, अॅड. वासुदेव अण्णा ढगे, बापूसाहेब पवार, नवले सर, राजाभाऊ थिटे, नागेशजी म्हस्के, शेखर थोरात, ऋषी पवार, जय कारकर, राजाभाऊ खेंडाद, विजूभाऊ साठे यांच्यासह परिसरातील मान्यवर, मित्रमंडळी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना आयोजकांनी सांगितले की, “परिसरातील प्रत्येक नागरिकाला पाणी मिळावे हा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे. मर्यादित साधनसामग्रीमुळे सर्व भागांमध्ये एकाच वेळी पाणीपुरवठा करणे शक्य होणार नसले तरी कोणत्याही भागावर अन्याय होणार नाही याची काळजी घेत टप्प्याटप्प्याने समान पद्धतीने पाणीपुरवठा केला जाईल.”5000नागरिकांनी संयम आणि सहकार्याची भूमिका घ्यावी, तसेच पाण्याचा जपून वापर करावा, असे आवाहनही यावेळी करण्यात आले. पाणीटंचाईच्या काळात लोकहिताचा विचार करून सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमामुळे अनेक कुटुंबांना दिलासा मिळणार असल्याची भावना उपस्थित नागरिकांनी व्यक्त केली. पाणी हीच जीवनरेखा असल्याची जाणीव ठेवत सामाजिक उत्तरदायित्वातून सुरू झालेला हा उपक्रम परिसरातील नागरिकांसाठी दिलासादायक ठरत आहे.5000

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button