पुणेमहाराष्ट्र

टपाल विभागाच्या निवृत्तीवेतन धारकांसाठी पेंशन अदालतीचे आयोजन

B1न्यूज मराठी नेटवर्क500

पुणे दि. १८: टपाल विभागाच्या निवृत्तीवेतन धारक व कुटुंब निवृत्तीवेतन धारकांसाठी ८ सप्टेंबर २०२६ रोजी ११.३० वाजता मुख्य पोस्टमास्तर जनरल, महाराष्ट्र सर्कल, मुंबई ४०० ००१ येथे पेंशन अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.

निवृत्तिवेतनधारकांच्या लाभाशी संबंधित तक्रारी, जे टपाल विभागातून निवृत्त झाले आहेत, ज्यांचा सेवेत असताना मृत्यू झाला आहे, अशा निवृत्तिवेतन संदर्भात ज्यांचे ३ महिन्यांच्या आत पूर्तता झालेली नाही अशा प्रकरणांचा डाक पेंशन अदालत मध्ये विचार केला जाईल.500पेंशन अदालतीमध्ये वारसा प्रमाणपत्र, वेतनश्रेणी वाढविणे आणि धोरणात्मक बाबींसह शिस्तभंगाच्या आणि डी.पी.सी. च्या पुनरावलोकनासाठी प्रलंबित प्रकरणांचा विचार केला जाणार नाही. पेन्शनधारकांनी आपली तक्रार वैयक्तिकरित्या संलग्न नमुन्यात तीन प्रतीमध्ये वरिष्ठ लेखाधिकारी, सचिव, पेन्शन अदालत, मुख्य पोस्टमास्तर जनरल यांचे कार्यालय, महाराष्ट्र सर्कल, मुंबई जी.पी.ओ. इमारत, १ ला मजला, मुंबई ४०० ००१ येथे पाठवावी किंवा ई-मेलद्वारे accts.mh@indiapost.gov.in या पत्त्यावर २५ ऑगस्ट रोजी किंवा त्यापूर्वी सादर करावी. विहित मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा पेन्शन अदालतमध्ये विचार केला जाणार नाही, असे पुणे ग्रामीण मंडळाचे अधीक्षक दि. वि. सर्जेराव यांनी कळविले आहे.500

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button