बार्शीमहाराष्ट्रसत्कार

अ. भा. गांधर्व मंडळाचे सूर्यवंशी, कुलकर्णी यांचा शंकरा स्टुडिओच्या वतीने बार्शीत सत्कार

B1न्यूज मराठी नेटवर्क

बार्शी : अखिल भारतीय गांधर्व मंडळ मुंबई येथील दोन वेळेस निवडणुकीत अध्यक्षपदी निवडून आलेले नवनिर्वाचित अध्यक्ष प्राध्यापक बाळासाहेब सूर्यवंशी (काम खेडकर) यांचा तसेच उपाध्यक्ष म्हणून निवडून आलेले देवेंद्रजी कुलकर्णी यांचा सत्कार बार्शीतील संगीत कलाक्षेत्रातील नामवंत संगीत विशारद शंकरा स्टुडिओचे सर्वेसर्वा शंकर वाघमारे यांच्या हस्ते शंकरा स्टुडिओमध्ये शाल श्रीफळ व ग्रामदैवत भगवंताची प्रतिमा देऊन यथोचित सत्कार करण्यात आला.

यावेळी त्यांच्या समवेत अखिल भारतीय गांधर्व मंडळाचे सुनील हुकीरे कोषाध्यक्ष यांचा सत्कार निलेश वाघमारे यांच्या हस्ते तर जनार्दन किशनराव गुडे कार्यकारणी सदस्य यांचा सत्कार कृष्णाजी खांडेकर सर व राहुल बोकेफोडे यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच त्यांचे समवेत असलेले अनिकेत देशमुख यांचा देखील सत्कार भालचंद्र राजगुरू सर यांच्या हस्ते करण्यात आला.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला अखिल भारतीय गांधर्व मंडळाचे संस्थापक पंडित विष्णू दिगंबर पलूसकर व नटराज्याच्या प्रतिमेचे पूजन करून व त्यांना अभिवादन करून करण्यात आले. यावेळी सत्काराला उत्तर देताना अखिल भारतीय गांधर्व मंडळाचे अध्यक्ष सूर्यवंशी सर यांनी बार्शीतील शंकरा स्टुडिओचे तोंड भरून कौतुक करून बार्शी तालुक्यातील ग्रामीण भागात संगीत क्षेत्र जिवंत ठेवून अनेक शिष्य निर्माण करणारे शंकर वाघमारे यांना मनपूर्वक शुभेच्छा देत.

अखिल भारतीय गांधर्व मंडळाच्या वतीने जे जे काही नियमात बसणारे असेल ते ते सर्व सहकार्य करण्याची ग्वाही अध्यक्ष सूर्यवंशी यांनी यावेळी दिली. यावेळी बार्शी शहर व तालुक्यात शंकरा स्टुडिओच्या माध्यमातून होत असलेले संगीत, कला, सांस्कृतिक क्षेत्रातील योगदानाची दखल घेत अखिल भारतीय गांधर्व मंडळाने बार्शी मध्ये संगीत महाविद्यालयाची सुरुवात करावी अशी मागणी छावा संघटनेचे तालुकाध्यक्ष तथा हिंदवी समाचार चे संपादक धीरज शेळके यांनी यावेळी केली.

यावेळी सुनील अवघडे जिल्हाध्यक्ष दलित महासंघ संगीत शिक्षक पंडित राजगुरू एडवोकेट वृषाली वाघमारे पुनम वाळके राजू लोखंडे यांच्यासह शंकरा स्टुडिओचे शेकडो सदस्य यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पुनम वाळके तर आभार शंकर वाघमारे यांनी मांनले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button