धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांचा बार्शी तालुका शिवसेनेच्या वतीने जाहीर सत्कार

B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : धाराशिवचे लोकप्रिय खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी शिवसेनेत ( एकनाथ शिंदे गट ) जाहीर प्रवेश केल्याबद्दल बार्शी तालुका व शहर शिवसेनेच्या वतीने त्यांचा जंगी सत्कार करण्यात आला. खासदार निंबाळकर यांच्या या पक्षप्रवेशामुळे धाराशिवसह सोलापूर जिल्ह्यातही पक्षाची ताकद मोठ्या प्रमाणावर वाढणार असल्याचा विश्वास यावेळी कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाच्या ठिकाणी शिवसैनिकांनी प्रचंड घोषणाबाजी करत खासदार ओमराजे निंबाळकर यांचे स्वागत केले. बार्शी तालुक्यात पक्षाची बांधणी अधिक मजबूत करण्यासाठी आणि तळागाळातील लोकांपर्यंत पक्षाची ध्येयधोरणे पोहोचवण्यासाठी सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी यावेळी एकमुखाने निर्धार केला.
या सोहळ्याला शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मीकांत ठोंगे-पाटील, जिल्हा उपाध्यक्ष पांडुरंग पाटील, आणि विधानसभा प्रमुख अविनाश शिंदे, तसेच महिला आघाडीच्या तालुकाध्यक्ष शितल मांजरे-पाटील, महेश देशमुख, मोहना गरजे यांच्यासह अनेक आजी-माजी पदाधिकारी, युवासेनेचे शिलेदार आणि मोठ्या संख्येने शिवसैनिक व कार्यकर्ते उपस्थित होते.




