महाराष्ट्रसोलापूर

उत्तराखंड येथे गेलेले सोलापूर जिल्ह्यातील ४ यात्रेकरूंच्या संपर्कासाठी प्रशासन प्रयत्नशील

B1न्यूज मराठी नेटवर्क

सोलापूर : जिल्ह्यातील कोणीही नागरिक उत्तराखंड येथे गेले असतील तर जिल्हा नियंत्रण कक्ष ०२१७/२७३१०१२ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन

सोलापूर जिल्ह्यातील चार यात्रेकरु /भाविक उत्तराखंड येथे गेलेले होते. त्यांची नावे व संपर्क क्रमांक पुढील प्रमाणे…
१) धीरज बागळे- ०८४२११३७७६५
२) समर्थ दासरी – ०९८२२११०९३६
३) विठ्ठल पुजारी – ०८८०५५२९७३७
४) मल्हारी धोटे – ९५६१९४६४५०

उपरोक्त भाविकांनी ओम साई ट्रॅव्हल्स हरिद्वार – उत्तराखंड येथून भाड्याने घेतलेले वाहन UK 08 TA 5672 घेतलेले होते. ट्रॅव्हल्स कंपनीचे शेवटचे ठिकाण – गंगोत्री पार्किंग येथे दाखवत आहे. अडकलेल्या कुटुंबाशी शेवटचा संपर्क – पाच ऑगस्ट २०२५ रोजी रात्री ११.०० वाजता झालेला आहे. त्यानंतर या भाविकांशी संपर्क झालेला नाही.

सोलापूर जिल्हा प्रशासन संबंधित यात्रेकरू/भाविक यांच्या संपर्कासाठी एनडीआरएफ टीम उत्तराखंड व महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन कक्ष यांच्या संपर्कात आहे, अशी माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शक्तिशागर ढोले यांनी दिली आहे.

तसेच सोलापूर जिल्ह्यातील अजून कुणी नागरिक/ यात्रेकरू/ भाविक उत्तराखंड येथे गेले असतील तर त्यांच्या नातेवाईकांनी संबंधित तालुक्यातील तहसीलदार यांच्याकडे किंवा जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्ष येथे किंवा दूरध्वनी क्रमांक (०२१७) २७३१०१२ या क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन सोलापूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्यामार्फत करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button