जयंतीबार्शीमहाराष्ट्र

बी. पी. सुलाखे कॉमर्स कॉलेज, बार्शीच्या वतीने कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे यांच्या जयंतीनिमित्त मैदानी स्पर्धांचे आयोजन

B1न्यूज मराठी नेटवर्क

बार्शी : श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ, बार्शी संचलित बी. पी. सुलाखे कॉमर्स कॉलेजतर्फे कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे यांच्या १२२ व्या जयंतीनिमित्त मैदानी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धा ३० जानेवारी २०२५ रोजी सकाळी ७ वाजता शिवशक्ती मैदान, बार्शी येथे संपन्न होणार आहेत.

या स्पर्धांमध्ये १०० मीटर, २०० मीटर, ४०० मीटर, ८०० मीटर, १५०० मीटर, ३००० मीटर, ५००० मीटर, १०,००० मीटर धावणे, लांब उडी, गोळाफेक आणि थाळीफेक यांचा समावेश करण्यात आला आहे. महाविद्यालयीन गट व खुला गट यामध्ये मुले आणि मुली या दोन्ही गटांसाठी या स्पर्धा खुल्या राहणार आहेत.

स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक स्पर्धकाला प्रमाणपत्र, ग्रंथ आणि ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. याशिवाय, प्रत्येक प्रकारात प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळवणाऱ्या स्पर्धकांना विशेष पारितोषिके देण्यात येणार आहेत.

स्पर्धेचे नियम व अटी :
१) पंचांचा निर्णय अंतिम राहील.
२) स्पर्धेसाठी प्रवेशिका क्रीडा शिक्षकांच्या सहीने पाठवणे बंधनकारक आहे. प्रवेशिका स्वीकारण्याची अंतिम तारीख २९ जानेवारी २०२५ राहील.
३) स्पर्धकांनी स्वतःचे साहित्य (गोळा व थाळी) सोबत आणावे.
४) प्रत्येक खेळाडूला जास्तीत जास्त दोन क्रीडा प्रकारांमध्ये सहभाग घेण्याची परवानगी असेल.
५) स्पर्धेची वेळ सकाळी ७ वाजता निश्चित आहे.
६) जिल्हा व तालुक्याबाहेरील स्पर्धकांनाही सहभागासाठी संधी उपलब्ध आहे.

बार्शी शहर, तालुका तसेच विविध जिल्ह्यांतील क्रीडाप्रेमींनी या स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन बी. पी. सुलाखे कॉमर्स कॉलेजच्या आयोजकांकडून करण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क:
१) डॉ. सोनटक्के डी. एम.: ९९२२३५५४२०
२) मा. श्रीमती शिंदे आर. आर.

स्पर्धेमुळे क्रीडाक्षेत्रातील नवोदितांना प्रोत्साहन मिळून त्यांचे कौशल्य उंचावण्यास मदत होईल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button