बार्शीमहाराष्ट्रशैक्षणिकसोलापूर

नेताजी सुभाषचंद्र बोस न. पा. शाळा क्र. १६, बार्शी येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उत्साहात साजरा

B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : नेताजी सुभाषचंद्र बोस न. पा. शाळा क्र. १६, बार्शी येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव भीमटायगर संघटनेचे संस्थापक शंकर वाघमारे यांच्या हस्ते झेंडावंदन करून उत्साहात आणि आनंदात साजरा करण्यात आला असल्याचे शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. सुशिला जाडकर यांनी सांगितले.
विदयार्थ्यांचे भाषण तसेच डान्स पाहून पालकांनी व आलेल्या मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले . स्वातंत्र्य दिनानिमित्त कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे भीमटायगर संघटनेचे संस्थापक शंकर ( दादा ) वाघमारे यांनी वह्या, पेन्सिल, पेन, खोडरबर, शार्पनर शैक्षणिक साहित्य , खाऊवाटप केले. विद्यार्थ्यांनी भाषण तसेच डान्स उत्साहात केले. कार्यक्रमाला ऍड. वृषाली वाघमारे , दयावान (आप्पा) कदम, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा सौ. आश्लेषा नलभे, शाळा व्यवस्थापन समिती शिक्षणतज्ञ क्षिरसागर सर , उत्तरेश्वर कुंभारे काका तसेच सौ. रेखा डिघे उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेतील शिक्षिका सौ. जस्मिन शेख यांनी केले तर आभार शोभा आगळे यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button