बार्शीमहाराष्ट्र

प्रामाणिक रिक्षाचालक मनोज जगताप यांचा माणुसकीचा आदर्श; ७० हजार रुपये व महत्त्वाची कागदपत्रे असलेली पर्स केली परत!

रिक्षाचालकाच्या प्रामाणिकपणाचे बार्शीत कौतुक; पोलीस निरीक्षक गणेश कुंभार यांच्या उपस्थितीत सत्कार

B1न्यूज मराठी नेटवर्क500

बार्शी : आजच्या धावपळीच्या जगात प्रामाणिकपणा आणि माणुसकी अजूनही जिवंत असल्याचा प्रत्यय बार्शी शहरात आला. रिक्षाचालक मनोज जगताप यांना बार्शी-कुर्डुवाडी रोडवरील पोतदार स्कूल परिसरात सापडलेली पर्स त्यांनी प्रामाणिकपणे संबंधित महिलेला परत केली. त्यांच्या या कृतीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

शनिवार, दिनांक १७ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ११ ते ११.३० वाजण्याच्या सुमारास बार्शी-कुर्डुवाडी रोडवरील पोतदार स्कूल परिसरात रिक्षाचालक मनोज जगताप यांना एक लेडीज पर्स सापडली. या पर्समध्ये महत्त्वाची कागदपत्रे, मोबाईल तसेच ७० हजार रुपये रोख रक्कम होती. एवढी मोठी रक्कम आणि मौल्यवान वस्तू असूनही त्यांनी कोणताही मोह न ठेवता पर्सच्या मूळ मालकाचा शोध घेऊन ती परत केली.500सौ. कांचन बरडे (रा. कासारवाडी रोड, बार्शी; तलाठी, परांडा) यांची ही पर्स असल्याचे समजल्यानंतर मनोज जगताप यांनी ती त्यांच्याकडे सुपूर्द केली. हरवलेली पर्स आणि त्यातील सर्व साहित्य परत मिळाल्याने बरडे यांना मोठा दिलासा मिळाला.
या प्रामाणिक कार्याबद्दल बार्शी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गणेश कुंभार तसेच बार्शी रिक्षा सेनेचे अध्यक्ष राजेंद्र मुळे यांच्या उपस्थितीत मनोज जगताप यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक करण्यात आले.
500

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button