छत्रपती संभाजीनगरमहाराष्ट्र

दुष्काळी उपाययोजना करतांना जलसंधारण आणि पाणी व्यवस्थापनाला प्राधान्य आवश्यक – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

B1न्यूज मराठी नेटवर्क500

छत्रपती संभाजीनगर, दि. १६ : दुष्काळावर दीर्घकालीन उपाययोजना करतांना जलसंधारण आणि पाणी व्यवस्थापनाला प्राधान्य देणे आवश्यक आहे. दुष्काळी पार्श्वभूमीवर मराठवाड्यातील शेतकऱ्यांना वेळेत मदत मिळणे आवश्यक आहे व त्यासाठी प्रयत्न सुरु आहेत, असे केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज सांगितले.

आठवले आज छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी मुकुंदवाडी परिसरातील जिमखाना क्लब येथे पत्रकार परिषदेत पत्रकारांशी संवाद साधला. फुलंब्रीच्या आमदार अनुराधा चव्हाण या यावेळी उपस्थित होत्या.

केंद्रीय राज्यमंत्री आठवले म्हणाले की, यंदा सुरुवातीला पाऊस झाला; मात्र त्यानंतर पावसात खंड पडल्याने अनेक भागांत दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. शासनाने दुष्काळ जाहीर केला असून, बाधित शेतकऱ्यांना मदत मिळणार आहे. विशेषतः पिण्याच्या पाण्याची उपलब्धता आणि जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर असून, त्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत. जनावरांच्या चाऱ्यासाठी देण्यात येणाऱ्या आर्थिक मदतीत वाढ करण्याची आवश्यकता आहे, असे आठवले यांनी सांगितले.500ते पुढे म्हणाले की, दुष्काळावर दीर्घकालीन उपाययोजना करतांना जलसंधारण आणि पाणी व्यवस्थापनाला प्राधान्य देणे आवश्यक आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नद्यांवरील धरणे आणि जलसंपत्तीच्या नियोजनाबाबत दूरदृष्टीपूर्ण विचार मांडले होते. त्यानुसार उपलब्ध जलस्रोतांचा प्रभावी वापर, जलसाठ्यांचे संवर्धन आणि पाण्याचे योग्य नियोजन करण्यावर भर देणे गरजेचे आहे, असे आठवले यांनी सांगितले.

आठवले यांनी सांगितले की, पर्यावरण संवर्धनालाही महत्त्व देण्याची आवश्यकता असून, भविष्यातील दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी शास्त्रज्ञ आणि तज्ज्ञांच्या माध्यमातून दीर्घकालीन आराखडा तयार करावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

दुष्काळामुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी तसेच मराठवाड्यातील बाधित शेतकऱ्यांना आवश्यक मदत मिळण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे आठवले यांनी सांगितले.500

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button