आंदोलनबार्शीमहाराष्ट्र

बाजार समितीच्या मालमत्तेवरील करातून सूट मिळण्यासाठी बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन रणवीर राऊत यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

B1न्यूज मराठी नेटवर्क

बाजार समितीच्या मालमत्तेवरील करातून सूट मिळण्यासाठी बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन रणवीर राऊत यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

बार्शी : बार्शी कृषि उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील स्थानिक प्राधिकरणाकडून सर्व मालमत्तेवर आकारला जाणा-या नगरपालिका कर वसुलीतुन सूट मिळावी, अशी मागणी चेअरमन रणवीर राऊत यांनी निवेदनातुन केली आहे. बाजार समितीचे मुख्य उत्पन्न म्हणजे शेतमालावरील मार्केट फी व बाजार समितीमधील मिळकतीचे भाडे हे आहे. त्यामधुन बाजार समिती विविध विकास कामे, पायाभुत सुविधा शेतकऱ्यासाठी विविध उपक्रम, रस्ते, दिवाबत्ती, साफ सफाई कर्मचाऱ्यांचे पगार, भविष्य निर्वाह निधी, कर्मचारी विमा व इतर सर्व सुविधा इ.खर्च केला जातो.

कृषी उत्पन्न बाजार समितीस वरील खर्चा व्यतिरिक्त बाजार समितीस मिळणाऱ्या उत्पन्न बाजार समितीने याबाबत ठराव करूण सदरची मागणी शासनकडे केली आहे.

सभापती रणवीर राऊत, संचालक रावसाहेब मनगिरे, झुंबर जाधव तसेच संचालकांच्या ठरावावर सह्या आहेत. निवेदनात म्हटले आहे की, बाजार समितीला शासन कुठलाही मार्केट फी वर महाराष्ट्र शासनास पाच टक्के देखरेख शुल्क व महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळास बाजार समितीच्या उत्पन्नावर पाच टक्के अंशदान दर वर्षी द्यावे लागते. केंद्र शासन व राज्य शासनाच्या खुल्या बाजार धोरणामुळे कृषी उत्पन्न बाजार समिती उत्पन्न दिवसेंदिवस कमी होत आहे व बाजार समितीचे अस्तित्व धोक्यात येत आहे. त्या करिता बाजार समितीच्या खर्चामध्ये बचत होणे गरजेचे आहे.कृषी उत्पन्न बाजार समितीचे बाजार आवारामध्ये स्थानिक प्राधिकरणाकडून रस्ते, दिवाबत्ती, स्वच्छता, साफसफाई, निर्जंतुकीकरण अशी कुठलीही सेवा पुरविली जात नाही. तरी बाजार समित्याकडून बाजार समितीच्या मिळकतीवर दरवर्षी लाखो रुपयांचा नगरपालिका कर आकारला जात आहे. यावर तात्काळ विचार करण्यात यावा. व कृषी उत्पन्न बाजार समितीवर होणारा अन्य थांबवावा अश्या प्रकारची मागणी करण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button