कृषीमहाराष्ट्रसोलापूर

सोलापूर जिल्ह्यात 22 ऑक्टोबरपासून एफएफएफएस प्रणालीद्वारे खत खरेदीची सुविधा मोबाईल अॅपद्वारे बुकिंग व क्यूआर कोडच्या माध्यमातून खत खरेदी करता येणार

B1न्यूज मराठी नेटवर्क500

सोलापूर दि.19 : सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना रासायनिक खते पारदर्शक व सुलभ पद्धतीने उपलब्ध करून देण्यासाठी 22 ऑक्टोबर 2026 पासून एफएफएफएस (FFFS) प्रणालीद्वारे खत खरेदीची सुविधा सुरू करण्यात येणार आहे. या प्रणालीमुळे शेतकऱ्यांना मोबाईलच्या माध्यमातून खत खरेदीची प्रक्रिया पूर्ण करता येणार असून, खत विक्री व्यवहारांमध्ये पारदर्शकता आणण्यास मदत होणार आहे.

या प्रणालीचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी मोबाईलमध्ये गुगल प्ले स्टोरवरून हे अॅप डाउनलोड करून आवश्यक नोंदणी प्रक्रिया पूर्ण करावी. आधार क्रमांक किंवा फार्मर आयडीच्या आधारे लॉगिन केल्यानंतर उपलब्ध खतांची माहिती पाहता येईल. त्यानंतर आवश्यक खतांचे बुकिंग करून अधिकृत विक्रेत्याकडून क्यूआर कोडच्या माध्यमातून खरेदी प्रक्रिया पूर्ण करता येईल.

काळाबाजार व जादा दराने खत विक्रीवर नियंत्रण
या प्रणालीमुळे खतांची उपलब्धता, मागणी आणि विक्री व्यवहारांची डिजिटल नोंद ठेवणे शक्य होणार आहे. परिणामी खतांचा काळाबाजार, कृत्रिम टंचाई, अनधिकृत साठेबाजी तसेच शेतकऱ्यांकडून जादा दर आकारण्याच्या प्रकारांवर नियंत्रण ठेवण्यास मदत होईल. तसेच खत वितरण व्यवस्थेत अधिक पारदर्शकता निर्माण होऊन शेतकऱ्यांना आवश्यक खते उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया अधिक सुलभ होईल.
500शेतकऱ्यांनी डिजिटल प्रणालीचा वापर करावा सोलापूर जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी या प्रणालीचा वापर करून खत खरेदी करावी, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात येत आहे. शेतकऱ्यांनी खत खरेदी करताना अधिकृत विक्रेत्यांकडूनच खते खरेदी करावीत, विहित दरापेक्षा जास्त दराने खते खरेदी करू नयेत तसेच खरेदीची पावती घ्यावी.

या प्रणालीच्या वापराबाबत शेतकऱ्यांना काही अडचणी आल्यास त्यांनी जवळच्या कृषी सहाय्यक, मंडळ कृषी अधिकारी, कृषी अधिकारी (गुनी) पंचायत समिती, कृषी अधिकारी (गुनी) तालुका कृषी अधिकारी कार्यालय किंवा तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, शुक्राचार्य भोसले यांनी केले आहे.500

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button