प्रशासनबार्शीमहाराष्ट्र

बार्शीत अवैध दारू विक्रीवर शहर पोलिसांचा छापा! रिंगरोड परिसरातून दारूचा साठा जप्त; एकास ताब्यात, २१ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त

B1न्यूज मराठी नेटवर्क500

बार्शी : बार्शी शहरातील रिंगरोड परिसरात अवैध दारू विक्रीविरोधात बार्शी शहर पोलिसांनी कारवाई करत देशी-विदेशी दारूचा साठा जप्त केला. श्री गणेश पानपट्टीच्या आडोश्याला विनापरवाना दारू विक्री होत असल्याचे आढळून आल्याने पोलिसांनी अभय दीपक सरकाळे (वय ३०, रा. झाडबुके मैदान, बार्शी) याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला. या कारवाईत दारूच्या साठ्यासह एकूण २१ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती पोलिसांनी दिली.

दि. १५ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास रिंगरोड परिसरातील श्री गणेश पानपट्टीच्या आडोश्याला विनापरवाना देशी-विदेशी दारूची विक्री सुरू असल्याची बाब पोलिसांच्या निदर्शनास आली. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल अजीज मनसुब शेख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संबंधित आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.500पोलिसांनी केलेल्या कारवाईत विविध ब्रँडच्या बिअर, व्हिस्की आणि देशी दारूच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या. त्यामध्ये हायवर्ड्स २००० बिअरच्या ६५० मिलीच्या २४ बाटल्या व ५०० मिलीच्या ६० बाटल्या, किंगफिशर बिअरच्या ६५० मिलीच्या २४ बाटल्या, रॉयल स्टॅग व्हिस्कीच्या ९० मिलीच्या ३८ व १८० मिलीच्या ७ बाटल्या तसेच टॅगो पंच आणि ढोकी संत्रा या देशी दारूच्या विविध क्षमतेच्या बाटल्यांचा समावेश आहे.

ही कारवाई सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे आणि बार्शी विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुहास जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलीस निरीक्षक गणेश कुंभार यांच्यासह सपोफौ वरपे, पोलीस नाईक जाधव, पोलीस कॉन्स्टेबल लक्ष्मण शेळके, शेख आणि राहुल बोंदर यांनी या कारवाईत सहभाग घेतला. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस नाईक जाधव करीत आहेत. शहरातील अवैध दारू विक्रीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांकडून करण्यात येणाऱ्या कारवाईकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.500

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button